शरद पवार:
महाराष्ट्राचा खरा जनमान्य लोकनेता. जबर अभ्यास, विविध विषयांवर वाचन, सलग १८-१८ तास काम करण्याची क्षमता, गावागावातल्या काऱ्यकर्त्यांना नावानिशी ओळखणार नेता अही त्यांची ओळख. अगदी हेलिकॉप्टरने जाताना सुद्धा खाली दिसणाऱ्या गावात कुठला कार्यकर्ता राहतो, काय काम करतो, त्याच्या घरी कोणकोण असते, त्याचा किती ’वट’ आहे सगळी माहिती ’साहेबां’ना पाठ. तेवढीच जवळिकीने प्रत्येकाची विचारपूसपण करणार. शेतकरी कुटुंबातून येऊन विक्रमी वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते याच
कार्यक्षमतेवर. वस्तुनिष्ठ विकासाचे ’बारामती मॉडेल’ जगात प्रसिद्ध झाले ते शरद पवारांमुळेच. कॉंग्रेस, जनता पार्टी, पुलोद, पुन्हा कॉंग्रेस आणि आत सवतासुभा राष्ट्रवादी कॉंग्रेस असा भक्कम अनुभव गाठीशी असणारा नेता एके काळी पंतप्रधानपदाचा प्रबल दावेदार होता. पण उत्तर भारतीय नेत्यांच्या राजकारणामुळे ती संधी निसटली. मुख्यमंत्रीपदाचा सर्वात कठीण काळ होता तो मुंबई बॉंबस्फोटांचा. पण एवढा हादरा बसून, शेअर बाजारात स्फोट होऊनही पुढच्या दोनचार दिवसांत बाजाराच्या दारात स्वतः उभे राहून बाजार उघडणारा मुख्यमंत्री जगाने पाहिला. सर्व पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारा, कट्टर विरोधी पक्ष असूनही शिवसेनेच्या बाळासाहेबांना मित्र म्हणणारा हा नेता निराळाच !! जाणता राजा !!.
Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts
Friday, February 26, 2010
Subscribe to:
Posts (Atom)

