ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती आई असावी तर जिजाऊ सारखी! मला उद्याचा बदल हवा आहे. का आपन भरकटतोय ? call 09595481717 "माझ स्वप्न-माझ ध्येय!! जिजाऊ- घरा घरात जिजाऊ !Call:9595481717" Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Wednesday, March 3, 2010

Akhand Bharat

Akhand Bharat 
It is a map of Akhand Bharat 
 "Desh hame deta hai sab kuch ham bhi to kuch dena sikhe".

 .

Monday, March 1, 2010

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी


करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी 
NDND
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. 

पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता अक्षरश: त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवरच डगमगतो. 

कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी स्वत:चा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

करीयरची संधी- 
विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवता येते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान तसे फारसे नसतेच. तसेच त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. त्याच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढली पाहिजे. 

करीयरची नवी क्षितीजे-
जाहिरात शास्त्र, बॅकिंग, ब्युटिशियन, बिझनेस मॅनेजमेंट, सिरॅमिक्स, चार्टर्ड अकाऊंटन्सी, रसायन शास्त्र, सिव्हील सव्हिसेस, विमानतळ व्यवस्था, कंपनी सेक्रटरी, स्थापत्यशास्त्र, हवाई दल, भूदल, नौदल, अर्थशास्त्र, शिक्षणाशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, पत्रकारिता, इंजिनिअरिंग, प्रदूषण नियंत्रण, व्यापारशास्त्र, फॅशन डिझायनिंग, फॅशन जर्नालिझम, मॉडेलिंग, फिल्म बनवणे, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, फार्मसी, नाट्यशास्त्र, जनसंपर्कशास्त्र, प्रकाशन व्यवस्था , लायब्ररी शास्त्र, कायदा, मानसशास्त्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण या सारख्या अनेक नव्या क्षेत्रात करीयरच्या संधी आहेत.

Saturday, February 27, 2010

तयारी सीईटीची


आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा
- नवनीत गुप्ता (संचालक- मास्टर माइंड क्लासेस)
आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.

दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.

साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 

* बारावीनंतर ड्रॉप घेऊन
* अकरावीदरम्यान 
* बारावीत असतान

आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 

विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....

आत्मविश्वास:
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.

तयारीः 
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.

नेमके मार्गदर्शन:
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.

लक्ष केंद्रीत करा:
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक बनवा:
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.

आपले कच्चे दुवे ओळखा:
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.

गुणवत्तेकडे लक्ष द्या :
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचीच परीक्षा घ्या:
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.

या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.

जीवनात यशस्वी होण्यासाठी हवा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड


हवा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड
जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टिकोन (अ‍ॅटिट्यूड) आवश्यक आहे. कारण तोच नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. तुम्ही कितीही हुषार असलात, पण दृष्टिकोन योग्य नसेल तर काहीही उपयोग नाही.
NDND

योग्य दृष्टिकोन कसा येईल? योग्य दृष्टिकोनाची सांगड सकारात्मकतेशीही आहे आणि तत्परतेशीही आहे. एखादी गोष्ट चांगली होण्याचा केवळ विचार करून चालत नाही, त्यादृष्टीने प्रयत्नही करावे लागतात. शिवाय त्यासाठी ती मी करून दाखवनेच हा सकारात्मक दृष्टिकोनही हवा असतो. केवळ वाट पाहून संधी येणार नसते. संधीकडे आपण जायला पाहिजे. आपला अ‍ॅटिट्यूड असा हवा. अन्यथा संधीची बस कधी चुकेल सांगता येत नाही. 
नेपोलिनय बोनापार्टच्या शब्दकोषात अशक्य असा शब्द नव्हता. म्हणूनच कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात घ्या. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण कायम लक्षात ठेवा. प्रयत्न केल्यास वाळूतूनही तेल निघू शकते हा आशावाद बाळगा. हे जमणार नाही, असा विचार मनात आल्यास खरोखर ते शक्य असले तरी तुमच्या हातून होणार नाही. पण हे मी करून दाखवेनच हा आत्मविश्वास असेल तर ते काम कितीही कठीण असले तरी होईल. अ‍ॅटिट्यूडचा फरक पडतो तो असा. 
कोणत्याही कामाला हलके समजू नका. ते करताना लाजू नका. कदाचित तेच काम तुमच्या आयुष्याची दिशा ठरवेल. तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. ते काम हलकेपणाने घेणाऱ्यांना ती संधी मिळणार नाही आणि त्यासाठी तुमचीच निवड होईल असेही घडू शकते. थोडक्यात ते काम करताना पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड ठेवा. 

लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही पॉझिटिव्ह असू द्या. कोणती व्यक्ती कधी कामी येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध फायदेशीरच ठरतात. तुमच्यासाठी कोण कधी देवदूत बनेल हे देवालाही सांगता येणार नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा आपल्याला यशाकडे घेऊन जातात. दुसऱ्याचा आदर, सन्मान राखणे यातूनही बरेच काही साध्य होते. हेच संबंध आपल्याला पदोन्नती किंवा मोठ्या जबाबदारीकडे नेतात. 

आपल्याला दिलेल्या कामाकडे जबाबदारीने बघायला शिका. लक्ष न देता काम केल्यास त्यातून चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. भलेही ते काम तुम्हाला आवडत नसो. पण ते करताना तुम्हाला ते आवडत नाही, असा दर्प त्यातून यायला नको. 
लक्षात ठेवा, यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फार फरक नसतो. यशस्वी लोक आपल्या चुकांमधून शिकतात आणि पुढे जातात. अयशस्वी मात्र चुकांमधून न शिकता, त्याच त्याच चुका परत करतात. त्यामुळे ते पुढे काही शिकू शकत नाहीत. परिणामी पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून प्रत्येक काम करताना आपला अ‍ॅटिट्यूड पॉझिटिव्ह हवा. यातूनच नव्या संधी आपल्यासाठी उपलब्ध होत असतात

आत्मविश्वास हीच गुरूकिल्ली


आत्मविश्वास हीच गुरूकिल्ली



व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. त्यातून नैराश्य येते.

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी उर्जा उत्त्पन्न होत असते. ही उर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात.

लिटल मास्टर सचिन जेव्हा पाक विरोधात प्रथम मैदानावर उतरला. तेव्हा त्याच्यासोबत नवज्योत सिद्धू मैदानावर खेळत होता. सचिन जेमतेम 16 वर्षांचा असेल, पाकिस्तानी खेळाडूच काय तर सिद्धूलाही सचिनला पाहून हसू आले होते.

सचिनला पाकच्या गोलंदाजाने पहिलाच बाउंसर टाकला. सचिन जरासा चकला आणि स्वत:चे रक्षण करण्यासाठी तो खाली वाकला. सिद्धुला वाटले, काय खेळाडू पाठवलाय? याला खेळता मुळीच येणार नाही. त्याने सचिनकडे जाऊन त्याची विचारपूस केली आणि खेळू शकशील का? असे विचारले?

सचिन निश्चिंत होता. काहीच न बोलता त्याने मानेनेच होकार दिला. आणि दुसर्‍या चेंडूपासून पाक खेळाडूंना या 16 वर्षांच्या पोर्‍याने मैदानावर नुसते पळवले. याला म्हणतात आत्मविश्वास. हा प्रत्येकातच असतो असे नाही. सचिन शाळेतून तडक मैदानावर आला होता असे नाही, तर त्याच्या नियमित सरावाने त्याला नवा आत्मविश्वास मिळाला होता. याच बळावर आज जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून तो नावारुपाला आला आहे.


तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता. परंतु तो आत्मविश्वास टिकवण्यासाठी तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे.

विठ्ठल कामत हे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. हो अगदी बरोबर, ज्या माणसाची शेकडो रेस्टॉरंट आहेत. पण हे विठ्ठल कामत एकदा आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. पण एका पेंटरमुळे त्यांनी आपला निर्णय बदलला.

झाले असे. कामत आपल्या डोक्यावरच्या कर्जाने हैराण होते. त्यांना मार्गच दिसत नव्हता. तेव्हा ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेले होते. ते कार्यालय अत्यंत उंचावर होते. तो मात्र काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तितक्यात त्याच्या खिडकीपाशी कामत गेले असता त्यांना एक क्षण त्या खिडकीतून ऊडी मारावी वाटली. परंतु, अचानक त्यांना समोर एका पेंटर तितक्याच उंचीवर काहीतरी रंगवत असल्याचे त्यांना दिसून आले. त्या पेंटरच्या हातात काहीच नव्हते. पडू नये म्हणून कशाचा आधारही त्याने घेतला नव्हता. परंतु तरीही तो त्याच्या कामात मग्न होता.

यावरून कामतांनी धडा घेतला. हा पेंटर आधाराशिवाय आत्मविश्वासाच्या बळावर जगू शकते तर मी का नाही? त्यांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावरचे कर्ज तर उतरवलेच. परंतु, आज त्यांच्या क्षेत्रात त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही.

कामत म्हणतात आपण आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत असतो. परंतु, आपण इतरांची परिस्थिती पाहिली तर आपण किती सुखात आहोत याचा आपल्याला अंदाजा येईल. खरं आहे हे.

आणखी एक अशीच गोष्ट आहे. एकदा एका अपघातात एका व्यक्तीचा एक हात मोडला. त्याला प्रचंड दु:ख झाले. त्याला नैराश्य आले. तो काही काम करण्‍यास तयार होईना. त्याने घराबाहेर पडणेच बंद केले. यामुळे त्याचे कुटुंबीय रसत्यावर आले. त्यांचे हाल सुरू झाले. तरीही ती व्यक्ती काही केल्या आपली निराशा सोडत नव्हता. एके दिवशी त्याचे कुटुंबीय त्याला एका मंदिरात घेऊन गेले, तिथे एक मुलगा फुलं विकत होता. त्याला त्याची आई जेवू घालत होती. त्याला पाहून त्या व्यक्तीलाही हुरुप आला. जर बालपणापासून त्या मुलाचे दोन हात नसताना तो फुलं विकून आपले घर चालवू शकतो तर मग मी का नाही हा विचार करुन त्यानेही पुन्हा नव्या उमेदीने व्यापार सुरू केला.

असेच जेव्हा तुम्हाला आपले दु:ख जास्त असल्याचे जाणवेल त्यावेळी तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे पहा मग तुम्हाला जाणवेल, की त्यापेक्षा तुम्ही अधिक सुखात आहात. म्हणून आपला आत्मविश्वास गमावू देऊ नका.

काही झाले तरी केवळ तुम्ही याच बळावर यश खेचून आणू शकता. तुमचे व्यक्तीमत्व जर सुधारायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे

Friday, February 26, 2010

शिक्षण


शिक्षण

शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्कच आहे.शासनाने सर्वांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.शिक्षणाचे खरे उद्देश्य विश्व ज्ञान असले तरी त्याचा रोजगाराशी सरळ सरळ संबंध असल्याने एका पातळी पर्यंतचे शिक्षण,आजच्या युगात, जीवनावश्यक झाले आहे.महाराष्ट्रात व्यावसायिक शिक्षणासाठी अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत.प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण ही बरेच वाढलेय.या सर्वां मागे मेहनत आहे ती खेडोपाडी काम करणाऱ्या शिक्षकांची.आय.टी. आणि संबंधित व्यवसायामध्ये कुशल मनुष्यबाळाची खूप गरज भासते आहे,त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेच्या भरभराटीच्या अजून खूप शक्यता आहेततसेच शेती विषयक तांत्रिक ज्ञानही आज असणे आवश्यक आहे 

कारण,जागतिकीकरणात प्रत्येकाला ह्या स्पर्धेचा भाग व्हावे लागेल.तेंव्हा आपल्याला शेती क्षेत्रात जास्तीत जास्त तांत्रिकीकरण करावे लागेल पण, त्या पूर्वी तेथील मनुष्यबळाला इतरत्र रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने पुढाकार घेऊन अनेक शिक्षण आणि रोजगार विषयक योजना चालवल्या आहेत.या योजनांची महाराष्ट्रातील शेवटच्या स्थारापर्यंत आणि कोपर्यापर्यंत माहिती पोहोचावी या साठी,या विभागात आपल्याला नवीन शिक्षण विषयक योजनांबद्दल आणि रोजगाराच्या नवीन संधींबद्दल माहिती मिळेल.तसेच आपल्या शिक्षण आणि रोजगार विषयक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल.मग तो प्रश्न आमच्या गावात शाळा किंवा कॉलेज उघडण्यासाठी काय करायचेते मला दहावीला ५५% पडलेत मी कोणता विषय घेऊ ? किंवा डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? किंवा मी पदवीधर आहे मला नौकरी कुठे मिळेल? कसाही प्रश्न असो,विचारा.प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल.


शिक्षण आणि रोजगार या बद्दलची विविध माहिती इथे मिळेल आणि त्यात नियमित भर घातली जाईल;म्हणून पुन्हा भेट देत राहा किंवा तुम्हाल हव्या असलेल्या माहितीबद्दल सरळ विचारा
आम्हाला सहकार्य करण्यास नक्कीच आवडेल. तसेच आपल्याकडे आपण राबवत असेले काही उपक्रम असतील किंवा काही माहित असेल तर ती ही नक्की पाठवा,
इथे त्या माहितीस प्रसिद्धी दिली जाईल.

संविधानाने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे केलेले आहे. सर्व शिक्षण अभियाना मोठ्या प्रमाणात शिक्षण क्रांती आणली जात आहे.

यातील काही अटी अशा आहेत
1)शाळा गाव पासून १ की.मी अंतराच्या आत असावी 
) शाळेत त्यांना पुस्तके मोफत मिळवीत 
)तसेच ४० विद्यार्थ्यांमागे कमीत कमी एक शिक्षक असावाच 
तसेच इतर अनेक अटी समविष्ट आहेत.पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणात काही गैर सोय तर होत नाही ना यावर लक्ष द्यावे. त्याच्या शाळा हे सर्व नियम पाळतात की नाही याची चौकशी करावी.गावातील तरुणांनी शाळेतील कारभारावर लक्ष ठेवावे.ग्रामपंचायतीला गरज पडेल तेंव्हा संबंधित विषयावर जाब विचारावा.मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष हा आजच्या काळात गुन्हाच ठरावा.
मग गुन्हेगार शासन वा पालक का असेना.संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि गावातील नागरिकांनी ह्या शिक्षणा साठी ग्रामापांच्यात आणि शाळेकडे आग्रह धरावा.गावातील सुशिक्षित युवक खाजगी संगणक केंद्र ही चालवू शकतात,ज्याने त्यांना रोजगार ही मिळेल आणि संगणक ही गावात येईल, बँका या साठी कर्ज पुरवठा करतात.

प्रत्येक वेळी शासनावर निर्भर न राहता गावाने मुलांच्या शिक्षणा साठी 
'ग्राम-शिक्षण-मोहीम' राबवावी ज्यात,गावातील सुशिक्षित पालक सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा सुट्टीच्या वेळेत,शिक्षण आणि इतर विषयावर मार्गदर्शन करावे
याने गावातील शैक्षणिक वातावरण मुलांच्या संगठीत प्रगतीसाठी पोषक होते.call9595481717

पक्षाच्या पलीकडले राजकारणी शरद पवार

शरद पवार:

महाराष्ट्राचा खरा जनमान्य लोकनेता. जबर अभ्यास, विविध विषयांवर वाचन, सलग १८-१८ तास काम करण्याची क्षमता, गावागावातल्या काऱ्यकर्त्यांना नावानिशी ओळखणार नेता अही त्यांची ओळख. अगदी हेलिकॉप्टरने जाताना सुद्धा खाली दिसणाऱ्या गावात कुठला कार्यकर्ता राहतो, काय काम करतो, त्याच्या घरी कोणकोण असते, त्याचा किती ’वट’ आहे सगळी माहिती ’साहेबां’ना पाठ. तेवढीच जवळिकीने प्रत्येकाची विचारपूसपण करणार. शेतकरी कुटुंबातून येऊन विक्रमी वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते याच 

कार्यक्षमतेवर. वस्तुनिष्ठ विकासाचे ’बारामती मॉडेल’ जगात प्रसिद्ध झाले ते शरद पवारांमुळेच. कॉंग्रेस, जनता पार्टी, पुलोद, पुन्हा कॉंग्रेस आणि आत सवतासुभा राष्ट्रवादी कॉंग्रेस असा भक्कम अनुभव गाठीशी असणारा नेता एके काळी पंतप्रधानपदाचा प्रबल दावेदार होता. पण उत्तर भारतीय नेत्यांच्या राजकारणामुळे ती संधी निसटली. मुख्यमंत्रीपदाचा सर्वात कठीण काळ होता तो मुंबई बॉंबस्फोटांचा. पण एवढा हादरा बसून, शेअर बाजारात स्फोट होऊनही पुढच्या दोनचार दिवसांत बाजाराच्या दारात स्वतः उभे राहून बाजार उघडणारा मुख्यमंत्री जगाने पाहिला. सर्व पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारा, कट्टर विरोधी पक्ष असूनही शिवसेनेच्या बाळासाहेबांना मित्र म्हणणारा हा नेता निराळाच !! जाणता राजा !!.