ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती आई असावी तर जिजाऊ सारखी! मला उद्याचा बदल हवा आहे. का आपन भरकटतोय ? call 09595481717 "माझ स्वप्न-माझ ध्येय!! जिजाऊ- घरा घरात जिजाऊ !Call:9595481717" Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Saturday, February 27, 2010

जीवनात यशस्वी होण्यासाठी हवा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड


हवा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड
जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टिकोन (अ‍ॅटिट्यूड) आवश्यक आहे. कारण तोच नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. तुम्ही कितीही हुषार असलात, पण दृष्टिकोन योग्य नसेल तर काहीही उपयोग नाही.
NDND

योग्य दृष्टिकोन कसा येईल? योग्य दृष्टिकोनाची सांगड सकारात्मकतेशीही आहे आणि तत्परतेशीही आहे. एखादी गोष्ट चांगली होण्याचा केवळ विचार करून चालत नाही, त्यादृष्टीने प्रयत्नही करावे लागतात. शिवाय त्यासाठी ती मी करून दाखवनेच हा सकारात्मक दृष्टिकोनही हवा असतो. केवळ वाट पाहून संधी येणार नसते. संधीकडे आपण जायला पाहिजे. आपला अ‍ॅटिट्यूड असा हवा. अन्यथा संधीची बस कधी चुकेल सांगता येत नाही. 
नेपोलिनय बोनापार्टच्या शब्दकोषात अशक्य असा शब्द नव्हता. म्हणूनच कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात घ्या. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण कायम लक्षात ठेवा. प्रयत्न केल्यास वाळूतूनही तेल निघू शकते हा आशावाद बाळगा. हे जमणार नाही, असा विचार मनात आल्यास खरोखर ते शक्य असले तरी तुमच्या हातून होणार नाही. पण हे मी करून दाखवेनच हा आत्मविश्वास असेल तर ते काम कितीही कठीण असले तरी होईल. अ‍ॅटिट्यूडचा फरक पडतो तो असा. 
कोणत्याही कामाला हलके समजू नका. ते करताना लाजू नका. कदाचित तेच काम तुमच्या आयुष्याची दिशा ठरवेल. तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. ते काम हलकेपणाने घेणाऱ्यांना ती संधी मिळणार नाही आणि त्यासाठी तुमचीच निवड होईल असेही घडू शकते. थोडक्यात ते काम करताना पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड ठेवा. 

लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही पॉझिटिव्ह असू द्या. कोणती व्यक्ती कधी कामी येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध फायदेशीरच ठरतात. तुमच्यासाठी कोण कधी देवदूत बनेल हे देवालाही सांगता येणार नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा आपल्याला यशाकडे घेऊन जातात. दुसऱ्याचा आदर, सन्मान राखणे यातूनही बरेच काही साध्य होते. हेच संबंध आपल्याला पदोन्नती किंवा मोठ्या जबाबदारीकडे नेतात. 

आपल्याला दिलेल्या कामाकडे जबाबदारीने बघायला शिका. लक्ष न देता काम केल्यास त्यातून चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. भलेही ते काम तुम्हाला आवडत नसो. पण ते करताना तुम्हाला ते आवडत नाही, असा दर्प त्यातून यायला नको. 
लक्षात ठेवा, यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फार फरक नसतो. यशस्वी लोक आपल्या चुकांमधून शिकतात आणि पुढे जातात. अयशस्वी मात्र चुकांमधून न शिकता, त्याच त्याच चुका परत करतात. त्यामुळे ते पुढे काही शिकू शकत नाहीत. परिणामी पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून प्रत्येक काम करताना आपला अ‍ॅटिट्यूड पॉझिटिव्ह हवा. यातूनच नव्या संधी आपल्यासाठी उपलब्ध होत असतात

No comments:

Post a Comment