शिक्षण आणि रोजगार या बद्दलची विविध माहिती इथे मिळेल आणि त्यात नियमित भर घातली जाईल;म्हणून पुन्हा भेट देत राहा किंवा तुम्हाल हव्या असलेल्या माहितीबद्दल सरळ विचारा,
आम्हाला सहकार्य करण्यास नक्कीच आवडेल. तसेच आपल्याकडे आपण राबवत असेले काही उपक्रम असतील किंवा काही माहित असेल तर ती ही नक्की पाठवा,
इथे त्या माहितीस प्रसिद्धी दिली जाईल.
संविधानाने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे केलेले आहे. सर्व शिक्षण अभियाना मोठ्या प्रमाणात शिक्षण क्रांती आणली जात आहे.
यातील काही अटी अशा आहेत:
1)शाळा गाव पासून १ की.मी अंतराच्या आत असावी
२) शाळेत त्यांना पुस्तके मोफत मिळवीत
३)तसेच ४० विद्यार्थ्यांमागे कमीत कमी एक शिक्षक असावाच
तसेच इतर अनेक अटी समविष्ट आहेत.पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणात काही गैर सोय तर होत नाही ना यावर लक्ष द्यावे. त्याच्या शाळा हे सर्व नियम पाळतात की नाही याची चौकशी करावी.गावातील तरुणांनी शाळेतील कारभारावर लक्ष ठेवावे.ग्रामपंचायतीला गरज पडेल तेंव्हा संबंधित विषयावर जाब विचारावा.मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष हा आजच्या काळात गुन्हाच ठरावा.
मग गुन्हेगार शासन वा पालक का असेना.संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि गावातील नागरिकांनी ह्या शिक्षणा साठी ग्रामापांच्यात आणि शाळेकडे आग्रह धरावा.गावातील सुशिक्षित युवक खाजगी संगणक केंद्र ही चालवू शकतात,ज्याने त्यांना रोजगार ही मिळेल आणि संगणक ही गावात येईल, बँका या साठी कर्ज पुरवठा करतात.
प्रत्येक वेळी शासनावर निर्भर न राहता गावाने मुलांच्या शिक्षणा साठी
'ग्राम-शिक्षण-मोहीम' राबवावी ज्यात,गावातील सुशिक्षित पालक सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा सुट्टीच्या वेळेत,शिक्षण आणि इतर विषयावर मार्गदर्शन करावे.
याने गावातील शैक्षणिक वातावरण मुलांच्या संगठीत प्रगतीसाठी पोषक होते.call9595481717
No comments:
Post a Comment