Thursday, February 25, 2010
स्पर्धा परीक्षेचे अर्ज नमुने पोस्टात दाखल
स्पर्धा परीक्षेचे अर्ज नमुने पोस्टात दाखल
(26-February-2010)
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणार्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचे सुमारे एक हजार अर्ज नमुने मुंबईहून येथील मुख्य टपाल कार्यालयात आले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 मार्चपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी वाढीव मुदतीतही अर्ज नमुने उपलब्ध न झाल्याने अनेक उमेदवार वंचित राहिल्याचे वृत्त दै.‘देशदूत’ने गेल्या सोमवारी प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत टपाल कार्यालयाने हे अर्ज नमुने मुंबईहून मागविले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 जानेवारी रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेंतर्गत नायब तहसीलदार व इतर पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यात 11 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठीचे अर्ज प्रधान टपाल कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र, येथील टपाल कार्यालयात सुरुवातीचे चारपाच दिवस वगळता अर्ज आले नाहीत. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत हीच परिस्थिती होती. अर्जांचा तुटवडा निर्माण झाल्याने अखेर अर्ज स्वीकृतीची मुदत 9 ऐवजी 22 फेब्रुवारी करण्यात आली. तरीही नगरच्या मुख्य टपाल कार्यालयात अर्जांचा पुरवठा झालेला नव्हता. या परीक्षेसाठी इच्छुक असलेले उमेदवार वारंवार टपाल कार्यालयांत चकरा मारत होते. मात्र, ‘अद्याप वरूनच फॉर्म आलेले नाहीत’ असे ठरलेले उत्तर त्यांना ऐकावे लागत होते. या संदर्भात दै. ‘देशदूत’ने 22 फेबु्रवारी रोजी टपाल कार्यालयात फॉर्म उपलब्ध न झाल्याने एमपीएसी उमेदवारांत चलबिचल या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मुंबईहून या परीक्षेसाठीचे अर्ज नमुने आले असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज घऊन जाण्याचे आवाहन वरिष्ठ पोस्टमास्तर वाय. पी. साळवे, जनसंपर्क अधिकारी बी. डी. निंबाळकर यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment